Prawaas

कुणा ना टळला, कुणा ना कळला
जगण्याचा हा अवघड घाट
कुणी ना जाणे वळणानंतर
कुठे नेमकी सरते वाट

प्रवास, प्रवास, हा प्रवास
प्रवास, प्रवास, हा प्रवास

थकते पाऊल, क्षिणती डोळे
रंग ही विरती आशेचे
हो, पानगळीच्या वाटेवरती मन
हळवे झुंबर काचेचे

हो, सावल्या ही सरतात सुखाच्या
जाणणार किती हा कळेना

हो, प्रवास, प्रवास, हा प्रवास
प्रवास, प्रवास, हा प्रवास

हवा वाटतो, परि ना मिळतो
प्रेम जिव्हाळा, मन सहवास
अश्या क्षणाला असे सोबती
गुदमरणारा केवळ श्वास

हो, प्रवास, प्रवास, हा प्रवास
प्रवास, प्रवास, हा प्रवास



Credits
Writer(s): Guru Thakur, Sulaiman, Salim
Lyrics powered by www.musixmatch.com

Link