Dhuvun Taak

पृथ्वी जल ब्रह्मांड विठ्ठल
जगतासी आधार विठ्ठल
अवघाचि साकार विठ्ठल
भक्तीचा उद्धार विठ्ठल
भक्तांचा उद्धार विठ्ठल
हरिनामे झंकार विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल...

तू बाप तूच बंधू तू सखा रे तूच त्राता रे
भूतली या पाठीराखा तूच आता
अंधार यातनेचा भोवती हा दाटलेला रे
संकटी या धावुनी ये तूच आता

होऊन सावली हाकेस धावली
तुजवीण माऊली जगू कैसे?
चुकलो जरी कधी तू वाट दावली
तुजवीण माऊली जगू कैसे?

करकटावरी ठेवोनी ठाकले विटेवर काय
माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय
साजिरे स्वरूप सुंदर तहानभूक हरपून जाय
माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय

ना उरली भवभयचिंता
रज तमही सुटले आता
भेदभाव कातरला रे
तनमनात झरली गाथा
तू कळस तूच रे पाया
मज इतुके उमजून जाता
राऊळात या देहाच्या
मी तुलाच मिरवीन आता

लोचनात त्रिभुवन अवघे, लेकरास गवसून जाय
माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय

संपू दे गा मोह मनीचा, वासना सुटावी हो
जन्म उभा चरणीची त्या वीट देवा व्हावी हो
कळस नको सोनियाचा पायरी मिळावी हो
सावळ्या सुखात इतुकी ओंजळी भरावी हो

भाबडा भाव अर्पिला उधळली चिंता सारी हो
शरण गे माय आता लागले चित्त हे तुझिया दारी हो

विझल्या मनातली दीपमाळ चेतली
बळ आज माऊली तुझे दे

मी तुझ्यात विरता माझी राहिलीच ओळख काय
माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय
मीपणाच सोडून जाता या कुडीत उरले काय
माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय

पृथ्वी जल ब्रह्मांड विठ्ठल
जगतासी आधार विठ्ठल
अवघाचि साकार विठ्ठल
भक्तीचा उद्धार विठ्ठल

अंतरी मिळे पंढरी सावळा हरि भेटला तेथं
बोलला कुठे शोधीशी मला दशदिशी तुझ्या मी आत
जाहलो धन्य ना कुणी अन्य सांगतो स्वये जगजेठी
तेजात माखले प्राण लागले ध्यान उघडली ताटी

ना उरली भवभयचिंता, रज तमही सुटले आता
भेदभाव कातरला रे, तनमनात झरली गाथा

हेऽ मी तुझ्यात विरता माझी राहिलीच ओळख काय
माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय
मीपणाच सोडून जाता या कुडीत उरले काय
माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय

माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली माऊली माऊली

माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली रूप तुझे
माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली रूप तुझे



Credits
Writer(s): Atul Gogavale, Ajay Gogavale, Guru Thakur
Lyrics powered by www.musixmatch.com

Link