Ruperi Valut Madanchya Banaat

रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना
रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना
बनात येना, जवळ घेना
बनात येना, जवळ घेना

चंदेरी चाहुल लावीत प्रीतीत येना
चंदेरी चाहुल लावीत प्रीतीत येना
प्रीतीत येना, जवळ घेना
प्रीतीत येना, जवळ घेना

बेधुंद आज आसमंत सारा
कुंजात गात मंद-धुंद वारा
दाटे उरी प्रिया तुझा इशारा
देहावरी फुले असा शहारा
तुझा इशारा असा शहारा

हाए, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना
चंदेरी चाहुल लावीत प्रीतीत येना
प्रीतीत येना, जवळ घेना
प्रीतीत येना, जवळ घेना

लाजेत आज ही फुले न्हाती
गाली अनार प्रीत गीत गाती
"तू ये निशा," अशी करे पुकारा
दे ये प्रिया मला तुझा निवारा
तुझा निवारा, तुझा निवारा

हाए, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना
चंदेरी चाहुल लावीत प्रीतीत येना
प्रीतीत येना, जवळ घेना
प्रीतीत येना, जवळ घेना
प्रीतीत येना, जवळ घेना
प्रीतीत येना, जवळ घेना



Credits
Writer(s): Anil Arun, Shantaram Nandgaokar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link