Tuzhi Gagar Nalala Laav

जागं झालंय सारं गाव, तांबडं फुटाया लागलं
जागं झालंय सारं गाव, तांबडं फुटाया लागलं
तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं
तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं

जागं झालंय सारं गाव, तांबडं फुटाया लागलं
जागं झालंय सारं गाव, तांबडं फुटाया लागलं
तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं
तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं

साऱ्या गावात काल बोभाटा झाला
पाणी येणार न्हाय सार्वजनिक नळाला
अगं, साऱ्या गावात काल बोभाटा झाला
पाणी येणार न्हाय सार्वजनिक नळाला

लवकर उरकून घे, लोकं उठाया लागलं
अगं, लवकर उरकून घे, लोकं उठाया लागलं
तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं
तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं

पाण्याच्या चिंतेन झोप झाली का नाही?
म्हणूनच उठवलं, जागं आली का नाही?
पाण्याच्या चिंतेन झोप झाली का नाही?
म्हणूनच उठवलं, जागं आली का नाही?

अगं, तरीही का गं तुझा डोळं मिटाया लागलं?
अगं, तरीही का गं तुझा डोळं मिटाया लागलं?
तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं
तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं

नको करू बाई लई सांडा-सांडी
अगं, गर्दी झाल्यावर होईल भांडा-भांडी
नको करू बाई लई सांडा-सांडी
अगं, गर्दी झाल्यावर होईल भांडा-भांडी

तुझ्या ओढा-ओढीनं cock तुटाया लागलं
तुझ्या ओढा-ओढीनं cock तुटाया लागलं
तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं
तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं

शेजार धर्म म्हणुन मी आलो जवळ
अगं, नंतर जीवाची होईल तळमळ
शेजार धर्म म्हणुन मी आलो जवळ
अगं, नंतर जीवाची होईल तळमळ

या संदीपच सांगण आता पटाया लागलं
या संदीपच सांगण आता पटाया लागलं
तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं
तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं

जागं झालंय सारं गाव, तांबडं फुटाया लागलं
जागं झालंय सारं गाव, तांबडं फुटाया लागलं
तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं
तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं

तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं
तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं



Credits
Writer(s): Ashok Waingankar, Sandeep Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link