Rang Nabhiche Rangoon Gele

रंग नभीचे रंगून गेले आज कुणाच्यासाठी?
प्रीत मनीची समजून घे गं, रंगू दे या भेटी
रंग नभीचे रंगून गेले आज कुणाच्यासाठी?
प्रीत मनीची समजून घे गं, रंगू दे या भेटी

ताल नवा हा घेऊन आला, हो
ताल नवा हा घेऊन आला
आज नवे हे सुख, आज नवे हे सुख
सजणी हे, सजणी, सजणा ओ, सजणा

नको जाऊ गं तू दूर-दूर
अशी लावू नको रे हुरहूर
नको जाऊ गं तू दूर-दूर
अशी लावू नको रे हुरहूर

झरझर वारे, खळखळ पाणी
सूर सनईचे मंजुळ गाणी
गुंफीत धागे दोन जीवांनी
लैला-मजनू प्रेम कहाणी

दोन जीवांच्या एक मनाला, हो
दोन जीवांच्या एक मनाला
प्रीतीचा अंकुर, प्रीतीचा अंकुर
सजणी हे, सजणी, सजणा ओ, सजणा

नको जाऊ गं तू दूर-दूर
अशी लावू नको रे हुरहूर
नको जाऊ गं तू दूर-दूर
अशी लावू नको रे हुरहूर

गंध केशरी पान-फुलांचे
आज कुणाला भान कुणाचे
तुजसंगे हे यौवन नाचे
आज पाहते स्वप्न उद्याचे

वाऱ्यावरती केस तुझे गं, ओ
वाऱ्यावरती केस तुझे गं
करती हुरहूर, करती गं हुरहूर
सजणी हे, सजणी, सजणा ओ, सजणा

नको जाऊ गं तू दूर-दूर
अशी लावू नको रे हुरहूर
नको जाऊ गं तू दूर-दूर
अशी लावू नको रे हुरहूर

निळे-निळे अंबर, रिमझिम चांदणे
रानी-वनी या डुलती पाने
स्वर लहरी या कोकीळ गाणे
सात सुरांचे मिलन होणे

तू तर माझ्या अमर प्रीतीचे, हो
तू तर माझ्या अमर प्रीतीचे
रसाळ गं अंगुर, रसाळ गं अंगुर
सजणी हे, सजणी, सजणा ओ, सजणा
नको जाऊ गं तू दूर-दूर



Credits
Writer(s): Bal Palsule, Bhagwan Patil, Dilipraj Wadkar, Sadanand Bongane, Sudhir Awale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link