Tu Sang Na

का सांग ना बावरले? कधी कसे सावरले?
श्वास हा रे नवा, मन हे का गुंतले?
स्वप्न सारे मला वाटते का नवे?
साथ दे तू जरा, सोबती चाल ना

बेधुंद मी, बेभान मी तुझ्यासवे तू सांग ना?
बेचैन मी, मधहोश मी का ना कळे?
तू सांग ना? (तू सांग ना?)

वाऱ्यावरी उडते मन माझे का खुलते?
पुन्हा-पुन्हा का वाहे गंध?
तुझ्यात मी ही फिरते, हूरहूर ही का उरते?
हवेहवेसे वाटे बंध

स्वप्न सारे मला वाटते का नवे?
साथ दे तू जरा, सोबती चाल ना
बेधुंद मी, बेभान मी तुझ्यासवे तू सांग ना?
(तू सांग ना?)

थांबला क्षण ही जरा
हलका-हलका हा नशा झालाया दाही दिशा
जादू ही कशी केली तू?
ऐकना, तू ही जरा झालो मी, झालो तुझा
हा जीव झाला तुझा साऱ्या जगाला सांग तू

झाले तूझी मी, तुझ्यात हरवले
स्वप्न सारे मला वाटते का नवे?
साथ दे तू जरा, सोबती चाल ना
बेधुंद मी, बेभान मी तुझ्यासवे तू सांग ना?

बेचैन मी, मधहोश मी का ना कळे?
तू सांग ना? (तू सांग ना?)
तू सांग ना? (तू सांग ना?)



Credits
Writer(s): Ashish-vijay, Rahul Kale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link