Bhas Ha Tujha

(भवताली गारवा, रिमझिमता मारवा)
(झुनझुनत्या मोहामधला चमचमणारा तारा)
(ओली ती चांदणी, थरथरता चांदवा)
(मातीचे सारे घमघमते अत्तर झाले गं)

का भास हा तुझा हळवे मन पुन्हा-पुन्हा
आला वाट मखमली घेऊन चिंब या खुणा
धुंद पावसाला ऐकना, स्पर्शाची चादर ओढना
हा, मस्तीचा मौसम अंगणात तळहाती हलके झेलना

का भास हा तुझा हळवे मन पुन्हा-पुन्हा
आला वाट मखमली घेऊन चिंब या खुणा

(भवताली गारवा, रिमझिमता मारवा)
(झुनझुनत्या मोहामधला चमचमणारा तारा)
(ओली ती चांदणी, थरथरता चांदवा)
(मातीचे सारे घमघमते अत्तर झाले गं)

मौसमात मस्त या मन हे फितूर झाले
ओठ चुंबले तुझे ठिणगीत आज न्हाले
पावसातली साद ही जपलेली काळजात
ओथंबून मन हे जाते, दरवळतो पारिजात

धुंद पावसाला ऐकना, स्पर्शाची चादर ओढना
हा, मस्तीचा मौसम अंगणात तळहाती हलके झेलना
का भास हा तुझा हळवे मन पुन्हा-पुन्हा
आला वाट मखमली घेऊन चिंब या खुणा

(भवताली गारवा, रिमझिमता मारवा)
(झुनझुनत्या मोहामधला चमचमणारा तारा)
चमचमणारा तारा
(ओली ती चांदणी, थरथरता चांदवा)
(मातीचे सारे...)

(भवताली गारवा, रिमझिमता मारवा) रिमझिमता मारवा
(झुनझुनत्या मोहामधला चमचमणारा तारा)
(ओली ती चांदणी, थरथरता चांदवा)
(मातीचे सारे घमघमते अत्तर झाले गं)



Credits
Writer(s): Nilesh Moharir, Ashwini C. Shende
Lyrics powered by www.musixmatch.com

Link