Tuz Dekhan Rup

चांदण पडलंय जसं
रूपानं तुझ्या गं सजलंय ना
डोळ्यात माझ्या दिसं
व्हटात नाव तुझं भरलंय ना

चांदणी जशी खुललिया
गालावर खळी पडलिया
रंगलंया आज सारं, नव्यानं उजाळलं

सैरावैरा मन हे गं पळतंय
तुझं देखणं रूप याड लावतंय
सैरावैरा मन हे गं पळतंय
तुझं देखणं रूप याड लावतंय

सैरावैरा मन हे गं पळतंय
तुझं देखणं रूप याड लावतंय
(लावतंय, लावतंय)

(सैरावैरा)

तुझ्यावर जीव भुलला असा
सांग माझी राणी तू होशील का?
हात तुझा हाती या देऊन गं
सात जन्मांची साथ देशील का?

नजरेनं सारं हेरलंय
काळजात काही रुतलंय
हसून तू हळूचं गं मनात घर केलंय
रंगलंया आज सारं, नव्यानं उजाळलं

सैरावैरा मन हे गं पळतंय
तुझं देखणं रूप याड लावतंय
हे सैरावैरा मन हे गं पळतंय
तुझं देखणं रूप याड लावतंय

सैरावैरा मन हे गं पळतंय
तुझं देखणं रूप याड लावतंय

तुझ्या मागं-मागं मी ही आले रं
तुझ्याशी रं मी ही नातं जोडलंया
सांग कधी बांधणार डोरलं रं?
तुझ्यासंग प्रीत माझी जुळलिया

प्रेम तुझं मला कळतंय
सुख मला सारं भेटलंय
तुझीच मी झाली ही रं
माझं ही भान गेलंय
रंगलंया आज सारं, नव्यानं उजाळलं

सैरावैरा मन हे रं पळतंय
माझं देखणं रूप याड लावतंय
सैरावैरा मन हे गं पळतंय
माझं देखणं रूप याड लावतंय

सैरावैरा मन हे रं पळतंय
माझं देखणं रूप याड लावतंय



Credits
Writer(s): Vijay Bhate
Lyrics powered by www.musixmatch.com

Link