Arpave Mi Kai Tula

सांदेपणींच्या आश्रमात शिकत असतांना कृष्णाला सुदामा भेटला
आणि तो साधा-भोळा मुलगा त्याचा मित्र बनून गेला
पुढे वेगळ्या झाल्या वाटा
सुदामा आयुष्यभर पोटा-पाण्याच्या चिंतेत राहिला
आणि कृष्ण द्वारकेचा राजा झाला

पण कृष्ण सुदामा भेट ही पुढे फक्त
राजाची प्रजेशी भेट नाही राहीली
गरीब-श्रीमंताचा, श्रेष्ठ-कनिष्ठाचा
सामान्य-असामान्याचा भेद मिटवणारी ती भेट
म्हणजे मैत्रीचा आदर्श ठरली

अर्पावे मी काय तुला रे?
अर्पावे मी काय तुला रे?
तू अवघ्या विश्वाचा स्वामी
पुरे कळाले आज मला रे

अर्पावे मी काय तुला रे?
अर्पावे मी काय तुला रे?

सांदीपणींच्या आश्रमात मी
तुला भेटलो होतो
तुझ्याबरोबर किती परींचे
खेळ खेळलो होतो

अर्धा उष्टा घासही तेव्हा
अर्धा उष्टा घासही तेव्हा
अजाणता मी दिला तुला रे

तू अवघ्या विश्वाचा स्वामी
पुरे कळाले आज मला रे
अर्पावे मी काय तुला रे?
अर्पावे मी काय तुला रे?

किती थोर झालास बांधवा
खूप ऐकल्या वार्ता
स्मरला स्नेह जुना अन आलो
तुला पाहण्या करता

अलंघ्यमधले अंतर लंघून
अलंघ्यमधले अंतर लंघून
भेटलास किती सहज मला रे

तू अवघ्या विश्वाचा स्वामी
पुरे कळाले आज मला रे
अर्पावे मी काय तुला रे?
अर्पावे मी काय तुला रे?

शूद्र शिदोरी माझी
वैभव अमित तुझे तू राजा
मैत्र जीवाचे दाखवून तू
मान राखला माझा

प्रिय सुरुदाचे सलगी देणे
प्रिय सुरुदाचे सलगी देणे
कैसे असते कळे मला रे

तू अवघ्या विश्वाचा स्वामी
पुरे कळाले आज मला रे
अर्पावे मी काय तुला रे?
अर्पावे मी काय तुला रे?
अर्पावे मी काय तुला रे?



Credits
Writer(s): Milind Milind
Lyrics powered by www.musixmatch.com

Link