Dhanya Dhanya Ho Pradakshina

धन्य-धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
धन्य-धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची

गुरुभजनाचा महिमा नकळे अगमा-निगमासी
अनुभव ते जाणती जे गुरुपदिचे अभिलाशी
धन्य-धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची

पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी
सर्वही तीर्थे घडली आम्हा आदि करूनी काशी
धन्य-धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची

मृदुंग-टाळ घोषी भक्त भावार्थे गाती
नामसंकीर्तने नित्यानंदे नाचती
धन्य-धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची

कोटी ब्रह्महत्या हरती करीता दंडवत
लोटांगन घालिता मोक्ष लोळे पायात
धन्य-धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची

प्रदक्षिणा करुनी देहभाव हरविला
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला
धन्य-धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची

धन्य-धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची



Credits
Writer(s): Nandu Honap, Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link