Hari Tujhi Kalali Chaturai(Jashas Tase)

हरी तुझी कळली चतुराई
हरी रे, भुलायची मी नाही
हरी रे, भुलायची मी नाही

गायीमागं गोप दवडुनी
लाखामधली एक निवडुनी
गायीमागं गोप दवडुनी
लाखामधली एक निवडुनी

आडरानी या मला अडवुनी
आडरानी या मला अडवुनी
दाविसी धिटाई, दाविसी धिटाई
हरी रे, भुलायची मी नाही
हरी रे, भुलायची मी नाही

गरीब, भोळ्या जरी गवळणी
गरीब, भोळ्या जरी गवळणी
खोडी काढता होऊ नागिणी

बळेच घेसी निंदा ओढुनी
बळेच घेसी निंदा ओढुनी
काय रे तऱ्हा ही, काय रे तऱ्हा ही
हरी रे, भुलायची मी नाही
हरी रे, भुलायची मी नाही

मी न एकटी इथे मोहना
जिवंत पुढती वाहे यमुना

धावुन येईल माझ्या वचना
धावुन येईल माझ्या वचना
हिरवी वनराई, हिरवी वनराई
हरी रे, भुलायची मी नाही
हरी रे, भुलायची मी नाही

हरी तुझी कळली चतुराई
हरी रे, भुलायची मी नाही
हरी रे, भुलायची मी नाही



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link