Ya Sukhanno Ya (Jhankar Beats)

या सुखांनो, या, या सुखांनो, या
या सुखांनो, या
एकटी पथ चालले
दोघांस आता हात द्या, साथ द्या
या सुखांनो, या

विरहांतीचा एकांत व्हा
अधीर व्हा आलिंगने
गाली-ओठी व्हा सुखांनो
भाववेडी चुंबने

होऊनी स्वर वेणूचे
वाऱ्यासवे दिन-रात या, गात या
या सुखांनो, या

बागेत व्हा लडिवाळ तुम्ही पाखरे
शयनघरच्या या छताची
व्हा रुपेरी झुंबरे

होऊ द्या घर नांदते
होऊ द्या घर नांदते
तुम्हीच त्यांना घास द्या, साथ द्या
या सुखांनो, या



Credits
Writer(s): G.d. Madgulkar, Sudhir Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link