Bandhu Yeil Maheri

बंधु येईल माहेरी न्यायला
बंधु येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला
गाडी घुंगराची येईल न्यायला
गाडी घुंगराची येईल न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला

सण वर्षाचा, सण गौरी गणपती
(सण वर्षाचा गणपती)
(सण वर्षाचा गणपती)
इथं येईल आनंदाला भरती
(येई आनंदाला भरती)
(येई आनंदाला भरती)

साडी चोळी नवी
साडी चोळी नवी नेसून मिरवायाला

गौरी गणपतीच्या सणाला
बंधु येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला

तिथं जमतील लाडक्या मैतरणी
(तिथं लाडक्या मैतरणी)
(तिथं लाडक्या मैतरणी)
फेर धरतील भवती साऱ्या जनी
(फेर धरतील साऱ्या जनी)
(फेर धरतील साऱ्या जनी)

मला विनवणी करतील नाचायला
मला विनवणी करतील नाचायला

गौरी गणपतीच्या सणाला
हो, बंधु येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला

माहेरी जाया घूमतं मन पाखरु
(हे घूमतं मन पाखरु)
(हे घूमतं मन पाखरु)
माय बापाची ओढ कशी आवरु
(ती ओढ कशी आवरु)
(ती ओढ कशी आवरु)

गोड कौतुक करउनी घ्यायला
गोड कौतुक करउनी घ्यायला

गौरी गणपतीच्या सणाला
बंधु येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला
गाडी घुंगराची येईल न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला
गौरी गणपतीच्या सणाला
गौरी गणपतीच्या सणाला
गौरी गणपतीच्या सणाला



Credits
Writer(s): Traditional
Lyrics powered by www.musixmatch.com

Link