Disate Majla Sukh Chitra Nave

दिसते मजला सुखचित्र नवे
दिसते मजला सुखचित्र नवे
मी संसार माझा रेखिते

दिसते मजला सुखचित्र नवे
मी संसार माझा रेखिते
दिसते मजला सुखचित्र नवे

प्रीत तुझी-माझी फुलावी
या फुलत्या वेलीपरी
भाव मुके ओठांत यावे
गंध जसा सुमनांतरी

शब्दाविना मन भावना
शब्दाविना मन भावना
अवघ्याच मी तुज सांगते

दिसते मजला सुखचित्र नवे
मी संसार माझा रेखिते
दिसते मजला सुखचित्र नवे

हात तुझा हाती असावा
साथ तुझी जन्मांतरी
मी तुझिया मागून यावे
आस ही माझ्या उरी

तुज संगती क्षण रंगती
तुज संगती क्षण रंगती
निमिषात मी युग पाहते

दिसते मजला सुखचित्र नवे
मी संसार माझा रेखिते
दिसते मजला सुखचित्र नवे

स्वर्ग मिळे धरणीस जेथे
रंग नवे गगनांगणी
सप्तसूरा लेवून यावी
रागिणी, अनुरागिणी

तुझियासवे सुख वैभवे
तुझियासवे सुख वैभवे
सौभाग्य हे नित मागते

दिसते मजला सुखचित्र नवे
मी संसार माझा रेखिते
दिसते मजला सुखचित्र नवे
मी संसार माझा रेखिते
दिसते मजला सुखचित्र नवे



Credits
Writer(s): Shanta Shelke, Anil Arun
Lyrics powered by www.musixmatch.com

Link