Vasudev Geet

शंभो शिव शंकरा हर हर हर हर महादेव
पार्वती शिव शंकरा स्मरण करा विठ्ठल रुक्मिणी वरा
अन कृपा करून हर निकाव स्वामी
न्या मज पंढरपूरा।

अशी हाय त्याची धारणा
गणता कोण करी
अहो गणता कोण करी
अन अर्जुनाची फोडी धुतली
अहो अर्जुनाची फोडी धुतली
तुमीच ओ श्री हरी।

अहो भिल्लीनीची ऊष्टी बोर
बहु आवडी तुला
रामा बहु आवडी तुला
अन द्नानेश्वराची कृपा चांगली हा
अहो द्नानेश्वराची कृपा चांगली
भित चाले झरझरा।

अंबरीशी कारण ठायी अवतार घेतल हरी
तुम्ही अवतार घेतल हरी
अन पुण्य कपाशी जाऊनशान हा
अहो पुण्य कपाशी जाऊनशान
ऊभा राहे पंढरी ।

नामदेवा संगट विठुबा
आवडीन जेवला
देव आवडीन जेवला
अन थोटया ताटाला कणस आणली हा
अहो थोटया ताटाला कणस आणली
महिमा तुझी विठ्ठला।

अन दामाजीची रशिद फाडूनी जाऊनी बेदरा
अहो जाऊनी बेदरा
अन सर्प डसुनी विन्चू चावूनी हा
अहो सर्प डसुनी विन्चू चावूनी
वाचविले पामरा।

अहो वासुदेव हो
हयो घ्या पैसा
अन माझ्या सासरयाच नाव हाय बाबूराव
अन तुमच नाव
या बया माझ नाव व्हय माझ नाव हाय सगुणा
गुणा
ईस गुणा न्हव सगुणा हाय सगुणा
अस अस
धर्म वाटीले पांडुरंगाने



Credits
Writer(s): Party, Shahir Nivruti Pawar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link