Avakhalase Rehash

गुरफटला जीव हा सोडवू मी कसा?
तु मला सांग ना, सांग ना
अवखळसे स्पर्श ते हरवले का असे?
तु मला सांग ना, सांग ना

लाट गेली जरी दुर त्या सागरी
जीव होता इथे टांगलेला परी
गाजती कोवळी ऐकु येता उरी
भाव घेई पुन्हा या किनाऱ्यावरी

भान राह तु तरी मी कशे या क्षणी?
तु मला सांग ना, सांग ना
अवखळसे स्पर्श ते हरवले का असे?
तु मला सांग ना, सांग ना

बांधता जन्म हा एकमेकांसवे
मिसळले जीवनी रंग सारे नवे
बांधता जन्म हा एकमेकांसवे
मिसळले जीवनी रंग सारे नवे

बंध ते रेशमी बहर दे या मनी
तु पुन्हा, ये पुन्हा, ये पुन्हा
अवखळसे स्पर्श ते हरवले का असे?
तु मला सांग ना, सांग ना

आज लाटानं त्या वादळाच्या जरी
माग उरले परि या किनाऱ्यावरी
आज लाटानं त्या वादळाच्या जरी
माग उरले परि या किनाऱ्यावरी

मी पुसावे कसे हे ठसे कालचे?
तु मला सांग ना, सांग ना
अवखळसे स्पर्श ते हरवले का असे?
तु मला सांग ना, सांग ना

ऐवूनी भेटते चोरट्या पाऊली
कालचे भास अन कालच्या चाहुली
ऐवूनी भेटते चोरट्या पाऊली
कालचे भास अन कालच्या चाहुली

ते शहारे तसे स्पर्शते मलमली
मेघ ते प्रीतिचे त्या सुखाचा सरी
आणि आतुरल्या आज ओठांवरी
खोल प्राणातली वाजते बासरी

बावऱ्या या क्षणी श्वास गंधाळती
रोम-रोमातली कंपने बोलते
भोवतालातुनी प्रीत झंकारता
मोहरावे किती? सावरावे किती?

चिंब मी या क्षणी आणि तु दोरूटा
सांग ना, सांग ना, सांग ना
अवखळसे स्पर्श ते हरवले का असे?
तु मला सांग ना, सांग ना

दरवळती भोवती भास सारे तुझे
का असे सांग ना, सांग ना?



Credits
Writer(s): Guru Thakur, Avadhoot Gupte
Lyrics powered by www.musixmatch.com

Link