Dis Jatil Dis Yetil

तुझ्या-माझ्या संसाराला आणि काय हवं
तुझ्या-माझ्या लेकराला घरकुल नवं
नव्या घरामंदी काय नविन घडंल?
घरकुला संग समदं येगळं होईल

दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल
दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल

अवकळा समदी जाईल निघूनी
तरारलं बीज तुझ-माझ कुशीतूनी
मिळंल का त्याला उन, वारा, पानी?
राहिल का सुकंल ते तुझ्या-माझ्या वानी?

रोप आपुलच पर होईल येगळं
रोप आपुलच पर होईल येगळं
दैवासंग झुंजायाचं देऊ त्याला बळं

दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल
दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल

ढगावानी बरसंल त्यो, वाऱ्यावानी हसवंल त्यो
ढगावानी बरसंल त्यो, वाऱ्यावानी हसवंल त्यो
फुलावानी सुखविल, काट्यालाबी खेळविल
समद्या दुनियेचं मन रिझविल त्यो

आसंल त्यो कुनावानी?
आसंल त्यो कुनावानी? कसा गं दिसंल?
तुझ्या-माझ्या जीवाचा त्यो आरसा असंल

दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल
दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल

उडूनिया जाईल ही आसवांची रात
अपुल्याचसाठी उद्या फुटंल पहाट
अपुल्याचसाठी उद्या फुटंल पहाट

पहाटच्या दंवावानी तान्हं तुझ-माझ
सोसंल गं कसं त्याला जीवापाड ओझं?
सोसंल गं कसं त्याला जीवापाड ओझं?

इवल्याशा पणतीचा इवलासा जीव
इवल्याशा पणतीचा इवलासा जीव
त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव

दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल
दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल

दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल
दिस जातील, दिस येतील
भोग सरंल...



Credits
Writer(s): Moghe Sudhir, Phadke V
Lyrics powered by www.musixmatch.com

Link