Nahi Yethe Kuni Kunacha

नाही येथे कुणी कुणाचा
नाही येथे कुणी कुणाचा
स्वार्थ हा एकच न्याय जगाचा
नाही येथे कुणी कुणाचा
नाही येथे कुणी कुणाचा

कुणी न इथला नित रहिवासी
जो-जो आला जाणे त्यासी
स्वार्थ सुटेना परि तयासी
स्वार्थास्तव कुणी इमान विकती
कोणी विकती वाचा

स्वार्थ हा एकच न्याय जगाचा
नाही येथे कुणी कुणाचा
नाही येथे कुणी कुणाचा

बळी कुणी स्वार्थाचे होती
जिवंत ते ही मरण भोगती
भुतासारखे जगी वागती
शाप बाधतो परि तयांना
तळमळत्या आत्म्याचा

स्वार्थ हा एकच न्याय जगाचा
नाही येथे कुणी कुणाचा
नाही येथे कुणी कुणाचा

सावध-सावध सोडव विळखा
दूर सारुनी फसवा बुरखा
पारखून घे अपुला परका
मायावी मयसभा असे ही
रंगमंच कपटाचा

स्वार्थ हा एकच न्याय जगाचा
नाही येथे कुणी कुणाचा
नाही येथे कुणी कुणाचा



Credits
Writer(s): Dutta N
Lyrics powered by www.musixmatch.com

Link