Pandurang Kanti Divya Tej Jhalakati

पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती
रत्नकीळ फांकती प्रभा
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती
रत्नकीळ फांकती प्रभा
अगणित लावण्य तेज पुंजाळले
न वर्णवे तेथींची शोभा

कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
येणें मज लावियला वेधु

खोळ बुंथी घेउनी खुणाची पालवी
आळविल्या नेदी सादु
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
येणें मज लावियला वेधु

शब्देविण संवादु, दुजेंवीण अनुवादु
शब्देविण संवादु, दुजेंवीण अनुवादु
हे तव कैसेंनि गमे
परेहि परतें बोलणे खुंटले
वैखरी कैसेनि सांगे
वैखरी कैसेनि सांगे

कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
येणें मज लावियला वेधु

पाया पडूं गेले तव पाउलचि न दिसे
पाया पडूं गेले तव पाउलचि न दिसे
उभाचि स्वयंभु असे
समोर की पाठिमोरा न कळे
समोर की पाठिमोरा न कळे
टकची पडिले कैसें

कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
येणें मज लावियला वेधु

क्षेमालागी जीव उतावीळ माझा
क्षेमालागी जीव उतावीळ माझा
म्हणवूनि स्फुरताती बाहो
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी ऐकली
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी ऐकली
आसावला जीव रावो

कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
येणें मज लावियला वेधु

बाप रखमादेवीवरू हृदयीचा जाणुनी
बाप रखमादेवीवरू हृदयीचा जाणुनी
अनुभवु सौरसु केला
दृष्टीचा डोळा पाहों गेलें
तंव भीतरीं पालटु झाला
तंव भीतरीं पालटु झाला

कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
येणें मज लावियला वेधु



Credits
Writer(s): Sant Dyaneshwar, Mangeshkar Hridyanath
Lyrics powered by www.musixmatch.com

Link