Tumhavar Keli Mee Marji Bahaal

तुम्हावर केली मी मर्जी बहाल
नका सोडुन जाऊ रंगमहाल

पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यांवरती
ही नजर उधळिते काळजातली पिरती
जवळी यावं, मला पुसावं, गुपित माझं खुशाल

हुरहुर म्हणू की ओढ म्हणू ही गोड
या बसा मंचकी, सुटंल गुलाबी कोडं
विरह जाळीता मला रात ही पसरी मायाजाल

लाडेलाडे अदबीनं तुम्हां विनवते बाई
पिरतीचा उघडला पिंजरा तुमच्या पायी
अशीच ऱ्हावी रात साजणा, कधी न व्हावी सकाळ



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Ram Kadam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link