Navratrila Navroop Too

नवरात्रीला नवरूपे तू
नवरात्रीला नवरूपे तू
लेवूनिया येसी
अवघ्या रुपी परि माऊली
एकच तू होसी

जय अंबे, जगदंबे
जय अंबे, जगदंबे
(नवरात्रीला नवरूपे तू)

प्रतिपदेला घटस्थापना
घटी बससी आई
द्वितीयेस रेणुका शोभसी
उदोकार होई

तृतीयेस शृंगार साजरा
मिरवीते अष्टभुजा

चतुर्थीस तू जगन्माऊली
चतुर्थीस तू जगन्माऊली
शंभुची गिरीजा

उपांग ललिता पंचमीस तू
व्रतभावे करिते
(जय अंबे, जगदंबे)
जय अंबे, जगदंबे
(नवरात्रीला नवरूपे तू)

षष्ठीला तुज कवळ्या अर्पून
गोंधळ घालिती
सप्तमीस तू सप्तशृंगी
गड चढुनी जासी

अष्टमीस सह्याद्री पर्वती
उभी माये अससी

नवमीला नवरात्र पारणे
नवमीला नवरात्र पारणे
होमहवन करिसी

दशमीला सिंहावर बसुनी
शिलंगळा जासी
जय अंबे, जगदंबे
जय अंबे, जगदंबे

(नवरात्रीला नवरूपे तू)
(लेवूनिया येसी)
(नवरात्रीला नवरूपे तू)



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link