Tuiya Raktamaghla Bhimrao Pahije

ना भाला, ना बरची, ना घाव पाहिजे
ना भाला, ना बरची, ना घाव पाहिजे
पण, तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे

तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे
(तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे)
(पण, तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे)

नव्या भागीताचे स्वप्न ते असु दे
तुझी भिमशक्ती जगाला दिसु दे
कुण्या गावथीचा दुआ साधला रे

आहे भिमयुगाचा नवा दाखला रे
ना पाटील, ना वाडा, ना गावं पाहिजे
ना पाटील, ना वाडा, ना गावं पाहिजे

पण, तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे
(तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे)
(पण, तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे)

असे कइक वैरी अचंबित केले
रुढीच्या नीतीला तूच चित केले
चाललो आम्ही पण शिखर वैभवाला

गरज आज नाही कुणाची आम्हाला
ना मंत्री, श्रीमंती, ना हाव पाहिजे
ना मंत्री, श्रीमंती, ना हाव पाहिजे

पण, तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे
(तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे)
(पण, तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे)

तुझा तूच पावा नवा वारसा तू
स्वतःला स्वतः घडव माणसा तू
नको मेजवानी अशी दुर्जनाची

भाकरी ती खाऊ, आम्ही इमानाची
ना रोटी, ना मस्का, ना पाव पाहिजे
ना रोटी, ना मस्का, ना पाव पाहिजे

पण, तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे
(तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे)
(पण, तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे)

उसळू दे त्या लाटा तुझ्या तिरावर्ती
आम्हाला मिळाली अशी ज्ञानभर्ती
सोडला आम्ही तो वाळवंट सारा

भिमाने दिला हा सुखाचा किनारा
ना दारिया, ना सागर, ना नाव पाहिजे
ना दारिया, ना सागर, ना नाव पाहिजे

पण, तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे
(तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे)
(पण, तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे)

ना भाला, ना बरची, ना घाव पाहिजे
ना भाला, ना बरची, ना घाव पाहिजे
पण, तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे
(तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे)

अरे, तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे
(तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे)
आता तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे
(तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे)



Credits
Writer(s): Sagar Pawar, Kamlesh Jadhav, Vilash Joglekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link