Mee Sukhane Nahale (Original)

मी सुखाने नाहले, मी सुखाने नाहले
काल जे स्वप्नात आले, आज डोळां पाहिले
मी सुखाने नाहले, मी सुखाने नाहले

बावरी, भोळी, खुळी गं मी स्वतःशी बोलते
बोलके हितगूज सारे वैभवाशी चालते
शब्द होता भावनेचे मी सुरांतुन गाइले
मी सुखाने नाहले, मी सुखाने नाहले

लेउनी सौभाग्यलेणे मी रहावे स्वागता
नाथ येता मी हसावे लाज नयनी जागता
लाडक्या देवासवे मी लीन होऊन राहिले
मी सुखाने नाहले, मी सुखाने नाहले

अमृताची ही घडी अन् अमृताचे चांदणे
अमृताचा स्पर्श होता काय मागू मागणे?
धन्य झाली आज काया, धन्य जीवन जाहले
मी सुखाने नाहले, मी सुखाने नाहले



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Prabhakar Jog
Lyrics powered by www.musixmatch.com

Link