Mee Aaj Phul Jhale (Original)

मी आज फूल झाले, मी आज फूल झाले
जणु कालच्या कळीला लावण्यरूप आले

सोन्याहुनी सतेज ही भासते सकाळ
किरणांतुनी रवी हा फेकीत इंद्रजाल
मी बावरी खुळी ग या सावलीस भ्याले

आली कशी कळेना ओठांस आज लाली
स्पर्शून जाय वारा शब्दांस जाग आली
फुलवून पाकळ्यां मी ओल्या दंवात न्हाले

मी पाहते मला का डोळे भरून आज?
लागेल दृष्ट माझी पदरी लपेल लाज
मी आज यौवनाचा शृंगारसाज ल्याले



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link