Yena Jaana Kaaho Sodala (Original)

येणे-जाणे का हो सोडले?
येणे-जाणे का हो सोडले? तोडले नाते
पहिल्यावाणी येत जा, सख्या, शपथ घालते
शपथ घालते, शपथ घालते
येणे-जाणे का हो सोडले?

सासरच्या घरी तुम्हास नसे अटकाव
(अटकाव, नसे अटकाव)
लागू नाही दिला कोणा मी मनाचा ठाव
(बाई ठाव, मनाचा ठाव)

मानिती मला मामंजी, मानतो गाव (मानतो गाव)
चालते खालती बघुन, जपून बोलते
पहिल्यावाणी येत जा, सख्या, शपथ घालते
शपथ घालते, शपथ घालते
का? येणे-जाणे का हो सोडले?

ध्यानात कुन्यांदा येतो
परताचा सोपा, परताचा सोपा
माहेरच्या मळ्यातील सांज
हळदीचा वाफा, हळदीचा वाफा

ओसाड जुने देऊळ
पांढरा चाफा, पांढरा चाफा (बाई चाफा)

तुझ्यापाशी आज, जिवलगा, उघड बोलते
पहिल्यावाणी येत जा, सख्या, शपथ घालते
शपथ घालते, शपथ घालते
का? येणे-जाणे का हो सोडले?
येणे-जाणे का हो सोडले?



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link