He Gardh Nile Megh

हे गर्द निळे मेघ बिलगून जशी वीज
मन आज दिवाणे गं
ताऱ्यांत असे जाग, धरणीस नसे नीज
हळू बोल, सखे तू गं
हे गर्द निळे मेघ...

घे शाल मिठीची ही बिलगून अशी राही
घे शाल मिठीची ही बिलगून अशी राही
रे चोर खुणांनी का हसतात दिशा ह्या गं?

ताऱ्यांत असे जाग, धरणीस नसे नीज
हळू बोल, सखे तू गं
हे गर्द निळे मेघ...

मी होऊनिया मुरली रे आले तुझ्या जवळी
मी होऊनिया मुरली रे आले तुझ्या जवळी
हे ओठ मुरारीचे किती काळ उपाशी गं

हे गर्द निळे मेघ बिलगून जशी वीज
मन आज दिवाणे गं
ताऱ्यांत असे जाग...



Credits
Writer(s): Rishiraaj, Murlidhar Gode
Lyrics powered by www.musixmatch.com

Link