Jiv Tutato Maitara Tujya Payi

अजून घुमते जुनी शीळ मोकळ्या रानी
अजून येते सुनी साद माझिया कानी
जरी तुझा तो हात हाती राहिला नाही
जीव तुटतो मैतरा तुझ्यापायी
जीव तुटतो मैतरा तुझ्यापायी

पाखरांची माळ अलगद तुटली कशी?
दोस्तीची शपथ सहजी सुटली कशी?
आ-आ, पाखरांची माळ अलगद तुटली कशी?
दोस्तीची शपथ सहजी सुटली कशी?

ज्या नभी मी विहरतो, तू त्या नभी नाही
जीव तुटतो, जीव तुटतो...
जीव तुटतो मैतरा तुझ्यापायी
जीव तुटतो मैतरा तुझ्यापायी
(जीव तुटतो...)

हे ऋतू सारे बहर वाटून घेण्याचे
एकमेकांभोवती उमलून येण्याचे
आ-आ, हे ऋतू सारे बहर वाटून घेण्याचे
एकमेकांभोवती उमलून येण्याचे

एकट्याने उमलण्याला ती मजा नाही
जीव तुटतो, जीव तुटतो...
जीव तुटतो मैतरा तुझ्यापायी
जीव तुटतो मैतरा तुझ्यापायी

अजून घुमते जुनी शीळ मोकळ्या रानी
अजून येते सुनी साद माझिया कानी
जरी तुझा तो हात हाती राहिला नाही

जीव तुटतो मैतरा तुझ्यापायी
जीव तुटतो मैतरा तुझ्यापायी
जीव तुटतो मैतरा तुझ्यापायी



Credits
Writer(s): Vaibhav Joshi, Harshit Abhiraj
Lyrics powered by www.musixmatch.com

Link