Mi Giridhar Var Varila

हाय दैया!

अर्ध्या रात्री यमुना पात्री
कर त्याने धरिला
गिरीधर वर वरिला
बाई मी गिरीधर वर वरिला
बाई मी गिरीधर वर वरिला

रंग-रंग नीत मजसी खेळतो
रंगनाथ माझा
मी मेवाडी राजदुलारी
मथुरेचा तो राजा

जगावेगळी लाभे सत्ता
ध्यास न दुसरा उरला
गिरीधर वर वरिला
बाई मी गिरीधर वर वरिला
बाई मी गिरीधर वर वरिला

फेर धरून मी नाच नाचले
न्याहळते शामा
मीच राधिका, मीच रुक्मिणी
मीच तयाची भामा

मुखी नाचते नाम तयाचे
ताल पैंजणी उरला
गिरीधर वर वरिला
बाई मी गिरीधर वर वरिला
बाई मी गिरीधर वर वरिला

कालिंदीच्या तटी कलयुगी
रोज रंगते होरी, रोज रंगते होरी
भिजे ओढणी, भिजे कंचुकी
भिजती अंगी सारी

आनंदाचा पडतो पाऊस
आनंदाचा पडतो पाऊस
मेघ सावळा सरला
गिरीधर वर वरिला

बाई मी गिरीधर वर वरिला
बाई मी गिरीधर वर वरिला
बाई मी गिरीधर वर वरिला
बाई मी गिरीधर वर वरिला



Credits
Writer(s): Prabhakar Jog, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link