Kaal Sari Raat

काल रात सारी मजसी झोप नाही आली
जीव झाला थोडा-थोडा, ऊर वर-खाली
काल रात सारी मजसी झोप नाही आली
(साजणी सखे, साजणी सखे, बाई गं)
(बाई गं, सखे, बाई गं)

पती दूरदेशी माझे, रूप माझे मजसी ओझे
पती दूरदेशी माझे, रूप माझे मजसी ओझे

मध्यान्हीच्या पारी दारी एक थाप आली
काल रात सारी मजसी झोप नाही आली
(साजणी सखे, साजणी सखे, बाई गं)
(बाई गं, सखे, बाई गं)

कशी आत घेऊ चोरा? कशी उघडू मी दारा?
कशी आत घेऊ चोरा? कशी उघडू मी दारा?

पाच माळ्यावरती माझी कोपऱ्यात खोली
काल रात सारी मजसी झोप नाही आली
(साजणी सखे, साजणी सखे, बाई गं)
(बाई गं, सखे, बाई गं)

काच कवाडाची होती, पतंगास कळली ना ती

भरारून तोची होता येत गं महाली
काल रात सारी मजसी झोप नाही आली
(साजणी सखे, साजणी सखे, बाई गं)
(बाई गं, सखे, बाई गं)

काचेवरी त्याची झेप, तीच मला वाटे थाप
काचेवरी त्याची झेप, तीच मला वाटे थाप

अशी तुझी मैत्रिण बाई, पाखरास भ्याली
काल रात सारी मजसी झोप नाही आली
(साजणी सखे, साजणी सखे, बाई गं)
(बाई गं, सखे, बाई गं)



Credits
Writer(s): Vasant Pawar, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link