Vedant Marathe Veer Daudale Saat

म्यानातुन उसळे तरवारीची पात
म्यानातुन उसळे तरवारीची पात
(वेडात मराठे वीर दौडले सात)
(वेडात मराठे वीर दौडले सात)

म्यानातुन उसळे तरवारीची पात
(वेडात मराठे वीर दौडले सात)
(वेडात मराठे वीर दौडले सात)

ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले
(ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले)
सरदार सहा सरसावुनी उठले शेले
(रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले)

उसळले धुळीचे मेघ सात निमिषात
उसळले धुळीचे मेघ सात निमिषात
(वेडात मराठे वीर दौडले सात)
(वेडात मराठे वीर दौडले सात)

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
(आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना)
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
(छावणीत शिरले थेट भेट गनिमांना)

कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
(वेडात मराठे वीर दौडले सात)
(वेडात मराठे वीर दौडले सात)

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
(खालून आग, वर आग, आग बाजूंनी)
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी
(गर्दीत लोपले सात जीव ते मानी)

खग सात जळाले अभिमानी वणव्यात
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
(वेडात मराठे वीर दौडले सात)
(वेडात मराठे वीर दौडले सात)

दगडांवर दिसतील अजुनी तेथल्या टाचा
(दगडांवर दिसतील अजुनी तेथल्या टाचा)
ओढ्यात तरंगे अजुनी रंग रक्ताचा
(क्षितिजावर उठतो अजुनी मेघ मातीचा)

अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात
अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात
(वेडात मराठे वीर दौडले सात)
(वेडात मराठे वीर दौडले सात)



Credits
Writer(s): Kusumagraj, Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link