Mitwaa

वेड्या मना सांग ना खुणावती का खुणा?
माझे मला आले हसू, प्रेमात फसणे नाही रे
वेड्या मना सांग ना व्हावे खुळे का पुन्हा?
तुझ्यासवे सारे हवे, प्रेमात फसणे नाही रे

धुक्यात जसे चांदणे, मुक्याने तसे बोलणे
हो, सुटतील केव्हा उखाणे

ना त्याला काही नाव नसावे
तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे
तू ही रे माझा मितवा

ना त्याला काही नाव नसावे
तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे
तू ही रे माझा मितवा, तू ही रे माझा मितवा

झुला भावनांचा उंच-उंच न्यावा
स्वतःशी जपावा तरी तोल जावा
हो, सुखाच्या सरींचा ऋतू वेगळा रे
भिजल्यावरी प्यास का उरे मागे?

फितूर मन बावरे, आतुर क्षण सावरे
हो, स्वप्नाप्रमाणे पण खरे

ना त्याला काही नाव नसावे
तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे
तू ही रे माझा मितवा

ना त्याला काही नाव नसावे
तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे
तू ही रे माझा मितवा, तू ही रे माझा मितवा

हो, वेड पांघरावे, न व्हावे शहाणे
ठेच लागण्याचे कशाला बहाणे
हुरहूर वाढे गोड अंतरी ही
पास-पास दोघात अंतर तरीही

चुकून कळले जसे, कळून चुकले तसे
हो, उन-सावलीचे खेळ हे

ना त्याला काही नाव नसावे
तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे
तू ही रे माझा मितवा
मितवा

तू ही रे माझा मितवाCredits
Writer(s): Javed Akhtar, Aloyius Mendonsa, Ehsaan Noorani, Shankar Mahadevan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link