Lankevar Kaal Kathin Aaj Patla

योग्य समयिं जागविलें बांधवा, मला
योग्य समयिं जागविलें बांधवा, मला
लंकेवर काळ कठिण आज पातला
लंकेवर काळ कठिण आज पातला

पाप्याप्रति आत्मघात, दुष्कर्त्म्या नरकपात
पाप्याप्रति आत्मघात, दुष्कर्त्म्या नरकपात
अटळचि जो नियतीनें नियम योजिला
लंकेवर काळ कठिण आज पातला

विभिषणकृत सत्यकथन, अप्रिय परि पथ्य वचन
विभिषणकृत सत्यकथन, अप्रिय परि पथ्य वचन
झिडकारुन एक आप्त तूंच हरविला
लंकेवर काळ कठिण आज पातला

मंदोदरि विनवी नित, हित गमलें तुजसि अहित
मंदोदरि विनवी नित, हित गमलें तुजसि अहित
भाव तिचा पायतळीं व्यर्थ तुडविला
लंकेवर काळ कठिण आज पातला

पाहुनिया देश समय, पडताळुन न्याय, अनय
पाहुनिया देश समय, पडताळुन न्याय, अनय
कार्याप्रति हात कधीं तूं न घातला
लंकेवर काळ कठिण आज पातला

मनिं आला तो निर्णय, ना विचार वा विनिमय
मनिं आला तो निर्णय, ना विचार वा विनिमय
सचिव कुणी पारखुनी तूं न पाहिला
लंकेवर काळ कठिण आज पातला

प्रिय तितकें ऐकलेंस, अप्रिय तें त्यागिलेंस
प्रिय तितकें ऐकलेंस, अप्रिय तें त्यागिलेंस
यांत घात तूंच तुझा पूर्ण साधिला
लंकेवर काळ कठिण आज पातला

उपदेशा हा न समय, लंकेशा, होइ अभय
उपदेशा हा न समय, लंकेशा, होइ अभय
कर्तव्या कुंभकर्ण नाहिं विसरला
लंकेवर काळ कठिण आज पातला

बोलवि मज बंधुभाव, रणिं त्याचा बघ प्रभाव
रिपुरक्तें भिजविन मी आज पृथ्विला
लंकेवर काळ कठिण आज पातला

सहज वध्य मजसि इंद्र, कोण क्षुद्र रामचंद्र!
सहज वध्य मजसि इंद्र, कोण क्षुद्र रामचंद्र!
प्राशिन मी क्षीरसिंधु, गिळिन अग्निला
लंकेवर काळ कठिण आज पातला

वचन हाच विजय मान, करि सौख्यें मद्यपान
वचन हाच विजय मान, करि सौख्यें मद्यपान
स्कंधीं मी सर्व तुझा भार घेतला



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link