Vegalya Jagat Ya

वेगळ्या जगात या अशी-कशी दंगले
वेगळ्या जगात या अशी-कशी दंगले
धुंद या स्वरात मी आज रंग रंगले
धुंद या स्वरात मी आज रंग रंगले
वेगळ्या जगात या...

वेगळ्या जगात या सूर आज रंगले
वेगळ्या जगात या सूर आज रंगले
धुंद या स्वरात मन आज दंग दंगले
धुंद या स्वरात मन आज दंग दंगले
वेगळ्या जगात या...

भरारून झेप घेई पाखरू मनाचे
भरारून झेप घेई पाखरू मनाचे
दाही दिशा मोकळ्या, या बंध ना कुणाचे
दाही दिशा मोकळ्या, या बंध ना कुणाचे

स्वप्न आज प्रीतीचे लोचनात जागले
स्वप्न आज प्रीतीचे लोचनात जागले
धुंद या स्वरात मी आज रंग रंगले
वेगळ्या जगात या...

झाड, वेल, फूल, पाने कुजबुजू बोलती
झाड, वेल, फूल, पाने कुजबुजू बोलती
तुझे-माझे गुपीत हे कानामधी खोलती
तुझे-माझे गुपीत हे कानामधी खोलती

एकांती संगतीचे वेड जणू लागले
एकांती संगतीचे वेड जणू लागले
धुंद या स्वरात मन आज दंग दंगले
वेगळ्या जगात या...

झोका घेई फांदीवर प्रीत माझी, साजणा
झोका घेई फांदीवर प्रीत माझी, साजणा
मिठीमधी रेशमाच्या येशील का सांग ना?
मिठीमधी रेशमाच्या येशील का सांग ना?

स्पर्श हा नवा-नवा, रोम-रोम झिंगले
स्पर्श हा नवा-नवा, रोम-रोम झिंगले
धुंद या स्वरात मी आज रंग रंगले
धुंद या स्वरात मन आज दंग दंगले

वेगळ्या जगात या अशी-कशी दंगले
वेगळ्या जगात या सूर आज रंगले
धुंद या स्वरात मी आज रंग रंगले
धुंद या स्वरात मन आज दंग दंगले



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Vishwanath More
Lyrics powered by www.musixmatch.com

Link