Ye Na Saajna

करतो इशारा आवेग माझ्या
बेभान श्वासातला
हो, पेटू दे आता, चेतू दे आता
अंगार देहातला

हा गार वारा, फुलणारा शहारा
या देहावरला, आता मला सोसे ना रे

ओठाचा माझ्या हा प्याला
भरलेला रे अतुरलेला
ओठी तुझ्या लाव ना रे

ये ना साजणा बरसून घे
ये ना साजणा स्पर्शून घे, घे ना रे
करतो इशारा आवेग माझ्या
बेभान श्वासातला

पिसाटलेला, उधानलेला
हा जीवघेघेणा नशीला समा
असुसलेल्या मिठीत ओल्या
घायळ हो ना जरा साजणा

पिसाटलेला, उधानलेला
हा जीवघेघेणा नशीला समा
असुसलेल्या मिठीत ओल्या
घायळ हो ना जरा साजणा

स्पर्शातील गोडी अनवेळी छळणारी
ही हुर-हूर थोडी रोखू कशी सांग ना रे?

ओठाचा माझ्या हा प्याला
भरलेला रे अतुरलेला
ओठी तुझ्या लाव ना रे
ये ना साजणा बरसून घे
ये ना साजणा स्पर्शून घे, घे ना रे

बेभान काया ही मोहराया
व्याकुळ ही रात रे कोवळी
खुलवून जा ना, फुलवुन जा ना
अलवार तू पाकळी, पाकळी

बेभान काया ही मोहराया
व्याकुळ ही रात रे कोवळी
खुलवून जा ना, फुलवून जा ना
अलवार तू पाकळी, पाकळी

हा गोठलेला, थिजलेला, भिजलेला
सजना विझलेला एकांत शिलगाव ना रे
हा गार वारा, फुलणारा शहारा
या देहावरला आता मला सोसे ना रे

ये ना साजणा बरसून घे
ये ना साजणा स्पर्शून घे
घे ना रे, घे ना रे, घे ना रे



Credits
Writer(s): Ajay-atul, Guru Thakur
Lyrics powered by www.musixmatch.com

Link