Yugayuganche Naate Apule - Original

युगायुगांचे नाते अपुले, नको दुरावा!
सहवासाची ओढ निरंतर, नको दुरावा!
सहवासाची ओढ निरंतर, सहवासाची ओढ निरंतर, नको दुरावा!
युगायुगांचे नाते अपुले, नको दुरावा!

भासे सारे सुने तुझ्यावीण, तुझ्याचसाठी आसुसले मन
तोडून बेड्या सर्व जगाच्या, कधी आपुले होईल मीलन
ऊन-सावल्या, ऊन-सावल्या झेलत हासत जन्म सरावा!
युगायुगांचे नाते अपुले, नको दुरावा!

जो तो आहे ज्याचा त्याचा, परके झाले सारे जीवलग
देह दोन परी एकच आत्मा, कुणा कळावी अपुली तगमग
एकच आशा, एकच आशा, शेवटचा दिस गोड करावा!

युगायुगांचे नाते अपुले, नको दुरावा!
सहवासाची ओढ निरंतर, सहवासाची ओढ निरंतर, नको दुरावा!
युगायुगांचे नाते अपुले, नको दुरावा!
युगायुगांचे नाते अपुले, नको दुरावा!



Credits
Writer(s): Modak Anand Gopal, Vijay Kuwlekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link