Aaj Jatret Jhali (From "Patlin")

आज जत्रेत झाली नवलाई
आज जत्रेत झाली नवलाई
तरणी म्हातारी झाली फिदा
अहो, तरणी म्हातारी झाली फिदा

त्यांना बघूनी, ह्यांना बघूनी
अंगा-अंगाची करते अदा
अंगा-अंगाची करते अदा
(अंगा-अंगाची करते अदा)
टकामका बघत्यात सारी मला
(गं बाई, सारी हिला, गं बाई, सारी हिला)
कुणा-कुणाला दावू मी माझी कला
(गं बाई, हिची कला, गं बाई, हिची कला)

नाच नाचून भिजली घामानं
नाच नाचून भिजली घामानं
किती वाकू मी तीन-तीनदा
किती वाकू मी तीन-तीनदा, हाय

त्यांना बघूनी, ह्यांना बघूनी
अंगा-अंगाची करते अदा
अंगा-अंगाची करते अदा
(अंगा-अंगाची करते अदा)
मला सारी म्हणत्यात देखणी तू
(बाई गं, देखणी तू, बाई गं, देखणी तू)
कुण्या कवीच्या हातात लेखणी तू
(बाई गं, लेखणी तू, बाई गं, लेखणी तू)

लाज पदरात माझ्या लपली गं
लाज पदरात माझ्या लपली गं
भरली डोळ्यात मी औंदा
भरली डोळ्यात मी औंदा, हाय

त्यांना बघूनी, ह्यांना बघूनी
अंगा-अंगाची करते अदा
अंगा-अंगाची करते अदा
(अंगा-अंगाची करते अदा)
ज्याला-त्याला वाटतंया अस्तुरी मी
(बाई गं, अस्तुरी ही, बाई गं, अस्तुरी ही)
पर हरणाची सुगंधी कस्तुरी मी
(बाई गं, कस्तुरी ही, बाई गं, कस्तुरी ही)

असं बेभान होऊन बघता का?
असं बेभान होऊन बघता का?
लई महागाचा ह्यो सौदा
लई महागाचा ह्यो सौदा

Hey, त्यांना बघूनी, hey, ह्यांना बघूनी
अंगा-अंगाची करते अदा
अंगा-अंगाची करते अदा



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link