Yere Ghana Yere Ghana

मराठी लोकांनी मला फार ४० वर्ष सतत प्रेम दिलं
इतक प्रेम, इतक्या लांब, इतक्या लांब turn मधे मला वाटत घरातली माणसं ही देत नाहीत
इतकं प्रेम तुम्ही दिलंत
मी बाहेरच्या देशात ज्यावेळी जाते, आणी मला Houston, Dallas
कुठल्याही गावामध्ये, कुठल्याही शहरामध्ये आवाज येतो
"आशाताई, आम्ही ५ जनं २०० मैलावरून आलोयत हो मराठी एक गाणं"
हे ऐकल की त्यावेळी अस, अस भरून येतं की "आशाताई" म्हणणारी मानसं आहेत
आणि माला काटा अंगावर...
तर तुम्ही लोकांनी जे प्रेम दिलय, आणि तुम्ही इतके चोखंदळ रसिक आहात की भीती वाटते आज गाताना
तरी पण तुम्ही, माझ काही चुकलं तर माफ करा

ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना
ये रे घना, ये रे घना
ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना
ये रे घना, ये रे घना

फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू
फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू
नको-नको म्हणताना, नको-नको म्हणताना गंध गेला राना-वना
ये रे घना, ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना
ये रे घना, ये रे घना

टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार
टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार
नको-नको म्हणताना, नको-नको म्हणताना मनमोर भर राना
ये रे घना, ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना
ये रे घना, ये रे घना

नको-नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू
नको-नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाट्याचा वारा मला रसपाना, वारा मला रसपाना
ये रे घना, ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना
ये रे घना, ये रे घना, ये रे घना, ये रे घना
ये रे घना, ये रे घना, ये रे घना, ये रे घना



Credits
Writer(s): Arati Prabhu, Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link