Number Fifty Four - Original

नंबर फिफ्टि फोर, दि हाऊस विथ दि बॅम्बू डोर!
बांबूचे घर, बांबूचे दार, बांबूची जमीन पिवळीशार!
बांबूच्या वनात वार्याचा सूर
जिवाला नेतो भुलवुनी दूर!
हाऊस ऑफ बॅम्बू!

बांबूच्या वनात झर्याच्या काठी
येशील सजणे माझ्याच पाठी!

बांबूच्या घरात स्वप्नांचा झूला
झुलवित राहील तुला नि मला!
हाऊस ऑफ बॅम्बू!
नंबर फिफ्टी फोर, दि हाऊस विथ दि बॅम्बू डोर!

बांबूचे घर पहायला हवे
बांबूच्या घरात रहायला हवे!

रूपाचा उजेड डोळ्यांचा दिवा
बांबूच्या घरात तेवायला हवा!
हाऊस ऑफ बॅम्बू!
नंबर फिफ्टि फोर, दि हाऊस विथ दि बॅम्बू डोर!



Credits
Writer(s): Chitalkar Ramchandra, Shanta Shelke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link