God Gojari Laj Lajari - Original

गोड-गोजरी, लाज-लाजरी ताई तू होणार नवरी
गोड-गोजरी, लाज-लाजरी ताई तू होणार नवरी
फुलाफुलांच्या बांधुन माळा...
फुलाफुलांच्या बांधुन माळा मंडप घाला गं दारी

गोड-गोजरी, लाज-लाजरी ताई तू होणार नवरी
गोड-गोजरी, लाज-लाजरी ताई तू होणार नवरी

करकमलांच्या देठावरती चुडा पाचुचा वाजे
हळदीहुन ही पिवळा बाले रंग तुला तो साजे
नथणी बुगडी लाजे, रूप पाहुनी तुझे
बांधु ताई मणि-मंगळ सरी

गोड-गोजरी, लाज-लाजरी ताई तू होणार नवरी
गोड-गोजरी, लाज-लाजरी ताई तू होणार नवरी
फुलाफुलांच्या बांधुन माळा...
फुलाफुलांच्या बांधुन माळा मंडप घाला गं दारी

गोड-गोजरी, लाज-लाजरी ताई तू होणार नवरी
गोड-गोजरी, लाज-लाजरी ताई तू होणार नवरी

भरजरी शालू नेसुनी झाली ताई आमुची गौरी
लग्न-मंडपी तिच्या समोरी, उभी तिकडची स्वारी
अंतरपाट धरी, शिवा-पार्वती वरी
लाडकी ही जाई बाई दुरी

गोड-गोजरी, लाज-लाजरी ताई तू होणार नवरी
गोड-गोजरी, लाज-लाजरी ताई तू होणार नवरी
फुलाफुलांच्या बांधुन माळा...
फुलाफुलांच्या बांधुन माळा मंडप घाला गं दारी

गोड-गोजरी, लाज-लाजरी ताई तू होणार नवरी
गोड-गोजरी, लाज-लाजरी ताई तू होणार नवरी



Credits
Writer(s): P Savalaram, Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link