Otit Ghatli Mulagi

ओटीत घातली मुलगी विहिण बाई
सांभाळ करावा हीच विनवणी पायी
ओटीत घातली मुलगी विहिण बाई
सांभाळ करावा हीच विनवणी पायी

वधुमाय तुम्ही ही तुम्हां सारे ठावे
वाटते तरीही आर्जवुनी सांगावे
वधुमाय तुम्ही ही तुम्हां सारे ठावे
वाटते तरीही आर्जवुनी सांगावे

मी पदर पसरते जन्मदायिनी आई
सांभाळ करावा हीच विनवणी पायी

माहेर आपुले सत्पुरुषांच्या वशी
सासरी वाढत्या सतत सुखांच्या राशी
माहेर आपुले सत्पुरुषांच्या वशी
सासरी वाढत्या सतत सुखांच्या राशी

पाठिशी आपुल्या नित्य उभी पुण्याई
सांभाळ करावा हीच विनवणी पायी

लाडकी लेक ही माझी पहिली-वहिली
भाग्येच तियेच्या सून आपुली झाली
लाडकी लेक ही माझी पहिली-वहिली
भाग्येच तियेच्या सून आपुली झाली

तुम्हीच या पुढे तिजसी माझ्या ठायी
सांभाळ करावा हीच विनवणी पायी
ओटीत घातली मुलगी विहिण बाई
सांभाळ करावा हीच विनवणी पायी



Credits
Writer(s): Arun Paudwal, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link