Ashi Kashi Odh Bai

(बिगी-बिगी-बिगी चाल गं)
(बाई, चाल गं मर्दिनी)
(बिगी-बिगी-बिगी चाल गं)
(बाई, चाल गं मर्दिनी)

(वाट बघत असंल घरधनी)
(न्यारीच्या गं पाई-पाई, न्यारीच्या गं पाई)
(पाया म्होर पळतंय मन)
(झाली त्याला घाई, झाली त्याला घाई)

अशी-कशी ओढ, बाई
असं-कसं वेड, विचारू कुणाला?
मनाला-मनाला गं, मनाला-मनाला
मनाला-मनाला गं, मनाला मनाला

प्रीतीनं हाक ही दिली, साद घातली
कुणाला-कुणाला?
मनाला-मनाला गं, मनाला-मनाला
मनाला-मनाला गं, मनाला मनाला

कळीला वारा फुंकर घाली
झुळूझुळू, का झुळूझुळू?
अन् पदर पाकळी उमलू लागे
हळूहळू, का हळूहळू?

सजणा सांगना? सजणा सांगना?
ही किमया असते अशी, जादू ही कशी
फुलविते मदनाला गं, फुलविते मदनाला

अशी-कशी ओढ, बाई
असं-कसं वेड, विचारू कुणाला?
मनाला-मनाला गं, मनाला-मनाला
मनाला-मनाला गं, मनाला मनाला

खट्याळ पाणी गातंय गाणी
गुणुगुणू, का गुणुगुणू?
अन् लाटांच्या पायी पैंजण बोले
रुणुझुणु, का रुणुझुणू?

सजणा सांगना? सजणा सांगना?
ह्या नदीला सागर दिसं, लागलं पिसं
खळखळत्या पाण्याला गं, खळखळत्या पाण्याला

अशी-कशी ओढ, बाई
असं-कसं वेड, विचारू कुणाला?
मनाला-मनाला गं, मनाला-मनाला
मनाला-मनाला गं, मनाला मनाला



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Ram Kadam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link