Nisargraja Kuni Majhya Manaat - Original

मेघांनो
वृक्षांनो
वेलींनो, कळयांनो, फुलांनो, वेलींनो, कळयांनो, फुलांनो
तेरी भी चूप, मेरी भी चूप
कुणाला काही सांगू नका
कबूल

निसर्गराजा, ऐक सांगते
गुपित जपलं रे
कुणी माझ्या मनात लपलंय रे
कुणी माझ्या मनात लपलंय रे
कुणी माझ्या मनात लपलंय रे
कुणी माझ्या मनात लपलंय रे
निसर्गराजा, ऐक सांगते

तो दिसला अन् मी पाहिले
पाहिले परि ते कुर्रयाने
डोळ्यांत इशारे हसले
हसले ते मोठ्या तोऱ्याने
हे कसे न त्याला कळले
कळले न तुझ्या त्या ओठाने

ओठ न हलले, शब्द न जुळले
ओठ न हलले, शब्द न जुळले
थोडे चुकले रे

कुणी माझ्या मनात लपलंय रे
कुणी माझ्या मनात लपलंय रे
कुणी माझ्या मनात लपलंय रे
कुणी माझ्या मनात लपलंय रे
निसर्गराजा, ऐक सांगतो

का चाललात?
तुम्ही आलात म्हणून
जरा थांबा ना
का?
वा छान दिसतंय
काय?
हे रूप भिजलेलं
आणि ते पहा
काय?
तुमचं मनही भिजलेलं
कशानं?
प्रेमानं, प्रेमानं, प्रेमानं, प्रेमानं
छट

निसर्गराजा, ऐक सांगतो
गुपित जपलंय रं
कुणी माझ्या मनात लपलंय रं
कुणी माझ्या मनात लपलंय रे
निसर्गराजा, ऐक सांगतो

तो भाव प्रीतिचा दिसला
दिसला मग संशय कसला?
हा नखरा का मग असला?
असला हा अल्लड चाळा
प्रेमात बहाणा कसला?
कसला तो प्रियकर भोळा

प्रीत अशी तर रीत अशी का, प्रीत अशी तर रीत अशी का?
कोडे पडलंय रं

कुणी माझ्या मनात लपलंय रं
कुणी माझ्या मनात लपलंय रे
कुणी माझ्या मनात लपलंय रे
कुणी माझ्या मनात लपलंय रे
निसर्गराजा, ऐक सांगतो
निसर्गराजा, ऐक सांगते
निसर्गराजा, ऐक सांगतो



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Ram Kadam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link