Aali Naar Thumkat Murdat

ग साजणी
कुण्या गावाची? कोणच्या नावाची?
कुण्या राजाची तू गं रानी?
आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत
हिरव्या रानी
(आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत)
(हिरव्या रानी)

आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत
हिरव्या रानी
(आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत)
(हिरव्या रानी)

खुळू-खुळू घुंगराच्या
(तालावर झाली दंग)
(तालावर झाली दंग)
ए, शालू बुट्टेदार
(लई लई झाला तंग)
(लई लई झाला तंग)
ए, सोसंना भार
(घामाघूम झालं अंग)
(घामाघूम झालं अंग)

गोऱ्या रंगाची, न्याऱ्या ढंगाची
चोळी भिंगाची, ऐन्यावानी ग

आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत
हिरव्या रानी
(आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत)
(हिरव्या रानी)

डाळींबाचं दानं तझ्या
(पिळलं गं व्हटावारी)
(पिळलं गं व्हटावारी)
ए, गुलाबाचं फुल तुझ्या
(चुरडलं गालावरी)
(चुरडलं गालावरी)
ए, कबुतर येडं खुळं
(फिरतया भिरीभिरी)
(फिरतया भिरीभिरी)

तुज्या नादानं झालो बेभान
जीव हैरान येड्यावानी ग

आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत
हिरव्या रानी
(आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत)
(हिरव्या रानी)

कवळ्यांत घेऊनीया
(अलगद उचलावं)
(अलगद उचलावं)
ए, मऊ मऊ हिरवाळीत
(दहिवरात भिजवावं)
(दहिवरात भिजवावं)
ए, पिरतीचं बेनं तुझ्या
(काळजांत रूजवावं)
(काळजांत रूजवावं)

लाडीगोडीनं पुढल्या ओढीनं
ऱ्हाऊ जोडीनं, राजा रानी ग

आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत
हिरव्या रानी
(आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत)
(हिरव्या रानी)

ग साजणी, साजणी ग
साजणी, साजणी, साजणी ग
अग, साजणी, साजणी ग
अग, साजणी, साजणी ग



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Ram Kadam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link