De Re Kanha Cholian Lugadi

हो, अहो ऐका, चतुरा अध्यात्माची कहाणी, बरं
किस्नानं भुलविल्या, हा, यमुनेवर गौळणी

रामा-रामा रं, दाजी
रामा रं, दाजी, हा

ऐन दुपारी गौळण नारी आल्या यमुनेवरी
खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी
वसने सुटली, अलगद पडली ओल्या काठावरी
ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिरशिरी?

गोपी न्हाण्यात होत्या दंग
तोच आला सखा-श्रीरंग
गोळा करुन वस्त्रं सारी
बसला चढून कळंबावरी

अरे, कान्हा, कान्हा
नको न्याहाळू नितळ काया ओलेती उघडी

दे रे कान्हा, कान्हा
दे रे चोळी अन् लुगडी
दे रे कान्हा, कान्हा
दे रे चोळी अन् लुगडी

बालपणीची अल्लड नाती
बालपणीची अल्लड नाती
मला कवळिले तू एकांती

अजूनी का तुज त्या खेळाच्या...
अजूनी का तुज त्या खेळाच्या छंदाची आवडी?

दे रे कान्हा चोळी-लुगडी
दे रे कान्हा, कान्हा, दे रे चोळी अन् लुगडी
(दे रे कान्हा, दे रे, दे रे चोळी -लुगडी)
(दे रे कान्हा, माझ्या कान्हा)
अरे कान्हा, कान्हा

ऐन वयाची किमया सारी
ऐन वयाची किमया सारी
लाजवंती मी भोळी-बावरी

कशी येऊ मी काठावरती...
कशी येऊ मी काठावरती मदनाची लालडी?

दे रे कान्हा चोळी-लुगडी
दे रे कान्हा, कान्हा, दे रे चोळी अन् लुगडी
(दे रे कान्हा, दे रे, दे रे चोळी -लुगडी)
(दे रे कान्हा, माझ्या कान्हा)
कान्हा, कान्हा

तूच दिली ही यौवनकांती
तूच दिली ही यौवनकांती
कशी लोचने आतुर होती

देहाहुन ही मुक्त भावना...
देहाहुन ही मुक्त भावना शरणागत बापुडी

दे रे कान्हा चोळी-लुगडी
दे रे कान्हा, कान्हा, दे रे चोळी अन् लुगडी
(दे रे कान्हा, दे रे, दे रे चोळी -लुगडी)
(दे रे कान्हा, माझ्या कान्हा)
अरे कान्हा, कान्हा

हात जोडिता बंधन तुटले
हात जोडिता बंधन तुटले
आता जिवाला मीपण कुठले?

आत्म्याने जणू परमात्म्याला...
आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी

दे रे कान्हा चोळी-लुगडी
दे रे कान्हा, कान्हा...
दे रे कान्हा, कान्हा, दे रे चोळी अन् लुगडी



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Ram Kadam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link