Kadhi Hi Navi Purani

कधी ही नवी-पुराणी, कधी भलती कहाणी
रात्र थोडीशी शहाणी, रात्र थोडीशी दिवाणी
कधी ही नवी-पुराणी, कधी भलती कहाणी
रात्र थोडीशी शहाणी, रात्र थोडीशी दिवाणी
कधी ही नवी-पुराणी...

कधी पांघरते माया, भूतला चवती छाया
गंध-धुंद होते रैना जणू अंतराचा पाया
कधी पांघरते माया, भूतला चवती छाया
गंध-धुंद होते रैना जणू अंतराचा पाया

कधी हासू रुजवाया थिजवीत आसवांनी
रात्र थोडीशी शहाणी, रात्र थोडीशी दिवाणी
कधी ही नवी-पुराणी...

कधी शृंगाराची धग परीकथा जिवलग
बाहुलीची पाठवणी हिची चाले लगबग
कधी शृंगाराची धग परीकथा जिवलग
बाहुलीची पाठवणी हिची चाले लगबग

कधी क्रूर हिचे जग भरलेले श्वापदानी
रात्र थोडीशी शहाणी, रात्र थोडीशी दिवाणी
कधी ही नवी-पुराणी...

कधी नादतो गंधार, शुक्र फुलतो मंदार
सुन्या-सुन्या पोकळीत कधी रिकामा अंधार
कधी नादतो गंधार, शुक्र फुलतो मंदार
सुन्या-सुन्या पोकळीत कधी रिकामा अंधार

कधी उमटे ओंकार अवलघ तरंगानी
रात्र थोडीशी शहाणी, रात्र थोडीशी दिवाणी
कधी ही नवी-पुराणी, कधी भलती कहाणी
रात्र थोडीशी शहाणी, रात्र थोडीशी दिवाणी
कधी ही नवी-पुराणी...



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link