Are Sansar Sansar - From "Manini"

अरे, संसार, संसार जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर
अरे, संसार, संसार जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर

अरे, संसार, संसार "खोटा" कधी म्हणू नये
राऊळाच्या कळसाला "लोटा" कधी म्हणू नये
अरे, संसार, संसार जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर

अरे, संसार, संसार नाही रडणं-कुढणं
अरे, संसार, संसार नाही रडणं-कुढणं
येड्या गळ्यातला हार, म्हणू नको रे लोढणं

अरे, संसार, संसार जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर

अरे, संसार, संसार दोन जीवांचा विचार
अरे, संसार, संसार दोन जीवांचा विचार
देत सुखाला नकार आणि दुखाःला होकार

अरे, संसार, संसार जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर
अरे, संसार, संसार...



Credits
Writer(s): Bahinabai Chaudhary, Vasant Pawar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link