Nakalat Saren Ghadale - From "Sadabahar Sangeetkaar Dashrath Pujari"

नकळत सारे घडले, नकळत सारे घडले
मी वळता पाऊल अडले, पाऊल अडले
नकळत सारे घडले

ते पहिले क्षण ओझरती
परीचयात ओळख नुसती
ते पहिले क्षण ओझरती
परीचयात ओळख नुसती

संभाषण ओठांवरती, संभाषण ओठांवरती
लाजण्यात राहून गेले, लाजण्यात राहून गेले

मी वळता पाऊल अडले, पाऊल अडले
नकळत सारे घडले

नजरेला नजरेमधला हसताना भाव उमगला
नजरेला नजरेमधला हसताना भाव उमगला
प्रीतीचा डाव ही पहिला
प्रीतीचा डाव ही पहिला

मी क्षणात मोहून हरले, मी क्षणात मोहून हरले

मी वळता पाऊल अडले, पाऊल अडले
नकळत सारे घडले

सोन्याहून अति मोलाचे, हे माझे गुपित मनीचे
सोन्याहून अति मोलाचे, हे माझे गुपित मनीचे
मन सुगंध उधळीत नाचे
मन सुगंध उधळीत नाचे

क्षण मलास का हे नकळे? क्षण मलास का हे नकळे?

मी वळता पाऊल अडले, पाऊल अडले
नकळत सारे घडले, नकळत सारे घडले



Credits
Writer(s): Dashrath Pujari, Ramesh Anavkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link