Ujalu Smruti Kashala

उजळू स्मृती कशाला...
उजळू स्मृती कशाला अश्रूंत दाटलेली?
सांगू कशी कहाणी स्वप्नात रंगलेली?
उजळू स्मृती कशाला...

आतूर लोचनांचे ते लाजरे बहाणे
मौनात साठलेले हित-गूजही दिवाणे

नाती मनामनाची भाषेविनाच जुळली
सांगू कशी कहाणी स्वप्नात रंगलेली?
उजळू स्मृती कशाला...

ते फूल भावनेचे कोषात आज सुकले
संगीत अंतरीचे ओठी विरून गेले

हृदयास जाळणारी आता व्यथाच उरली
सांगू कशी कहाणी स्वप्नात रंगलेली?
उजळू स्मृती कशाला...

तू दाविलेस, सखया, मज चित्र नंदनाचे
उधळून तेच गेले संचित जीवनाचे

आता कुठे किनारा? माझी दिशाच चुकली
सांगू कशी कहाणी स्वप्नात रंगलेली?
उजळू स्मृती कशाला...



Credits
Writer(s): Vandana Vitankar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link