Ushakaal Hota Hota

उषःकाल होता-होता काळरात्र झाली
उषःकाल होता-होता काळरात्र झाली
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

(उषःकाल होता-होता काळरात्र झाली)
(अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली)
उषःकाल होता-होता काळरात्र झाली

आम्ही चार किरणांचीही आस का धरावी?
(आम्ही चार किरणांचीही आस का धरावी?)
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी?
(जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी?)

कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली
उषःकाल होता-होता काळरात्र झाली

तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
(तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती)
आम्हावरी संसाराची उडे धूळ-माती
(आम्हावरी संसाराची उडे धूळ-माती)

आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेत ही ना वाली
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेत ही ना वाली
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली
उषःकाल होता-होता काळरात्र झाली

उभा देश झाला आता एक बंदीशाला
(उभा देश झाला आता एक बंदीशाला)
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला
(जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला)

कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली
कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली
उषःकाल होता-होता काळरात्र झाली

धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे
(धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे)
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
(अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे)

आसवेच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली
आसवेच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

उषःकाल होता-होता काळरात्र झाली
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली



Credits
Writer(s): Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link