Karito Vandana Gajanana

करितो वंदना गजानना,
करितो वंदना गजानना
तुम्ही हासत नाचत या अंगणा,
तुम्ही हासत नाचत या अंगणा
करितो वंदना गजानना

चौदा विद्येचे तुम्हीच करता
तुम्हीच आधी तू ही अंता
पूर्ण करिशी आमुची मनोकामना ||1||

सिद्धिविनायक विघ्नविनाशक
चिंतामणी तू अष्टविनायक
घेण्या दर्शन आलो गौरीनंदना ||2||

तू सुखदायक दुख: निवारक
वक्रतुंड तू ब्रह्मांडनायक
मनोभावे करतो तुझी प्रार्थना ||3||

-सुप्रिया सुरेश परब



Credits
Writer(s): Milind Mohite, Shravan Bala
Lyrics powered by www.musixmatch.com

Link